Sunday, February 8, 2009
Chitpavan Meet
मी साधारणपणे ७ वा उद्यानापाशी आलो. तेथे कोणि नव्हते त्यामुळे मी बागेकडे पाठ करुन,समोरील रस्त्यावर हालचाल पाहण्यात वेळ काढु लागलो . पुण्यातील गुलाबी थंडी काशाला म्हणतात ते पाहात होतो. पण माझ्या ज्ञानात आधिक भर पडु नये म्हणुन कि काय केतन आचानकपणे माज़्या पुढ्यात येउन उभा राहिला त्याच्या बरोबर राहुल जोशी होता. एकमेकांची ओळख़ परेड झाल्यावर , माझ्या बरोबर ते पण गुलाबी थंडी पाहु लागले. त्यानंतर इतर मेंबर येउ लागले. हा हा म्हणता १५ जण जमले. आजचे विशेष पाहुणे हे आदि ज़ोशि साधारणपणे ८ वाजायला आले , एव्हाना सगळ्याचे पाय पण बोलायला लागले होते .त्यामुळे काहीजण डोलायला लागले होते. त्यामुळे आता बागेत जाउन बसण्या शिवाय दुसरा मार्ग नव्हता . सर्व जण बागेतील कारंज्याच्या दिशेने निघाले. कारंज्याच्या ख़ाली गोलाकार काट्टा आहे तेथे सर्वजण बसले . मग पुन्हः ओळख़ परेड सुरु झाली माझ्या शेजारी बसलेल्यांची ओळख़ करुन देण्याचा बहाणा करत प्रसादने आपला मोर्च्या माझ्या दिशेने वळवला व माझी ओळ्ख़ " हा फक्त भविष्य सांगतो पण भविष्य बदलुन देत नाही " आशी करुन दिली हे एकुन एकच हाशा पिकला पण माझा मात्र पुरता पोपट झाला . पुढे् फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरु झाला . त्यानंतर पुन्हा गप्पा सुरु झाल्या ऑर्कुत वर directly मराठी टाईप कसे कारायचे यावर आणी आनेक विषयांवर चर्च्या झाली. होता होता ८.३० वाजले आणी बागेचा रख़वालदार आम्हाला बाग बंद करायची आसे सांगुन गेला . त्यानंतर आम्ही सर्व जण समुद्रात गेलो . तेथे आजुबाजुला मासे पोहत होते , त्यांच्या पलीकडे काही रंगीत मासे हासत हासत चहा पित होते. एवढ्यात एक वेटर आला व काय पाहीजे ते इचारू लागला सर्व जण कोके आसल्याने चहा शिवाय आधिक काहि घेणार नाहित हे त्याने ओळख़ले .आता पेशल चहा कि साधा या वर चर्च्या झाली. विसळलेल्या कप बशीत चहा देतात त्याला पेशल चहा म्हणतातआसे केतन/ आनिकेत यापैकी कोणितरी सगितले त्यामुळे पेशल चहा घेण्याचे ठरले. होटेल्च्या बाहेरच्या पुन्हा गोलाकार बसुन गप्पा सुरु झाल्या . होटेल मध्ये गर्दि वाढत होती त्यामूळे आंम्ही तेथुन बाहेर पड्लो . आता बाहेर गप्पा सुरु झाल्या , होता होता ९.३० वाजले . मग मात्र सर्व जण आपापल्या दिशेने निघाले. आशी ही पुणे मीट खुप छान झाली.आशी ही साठा / साठे ऊत्तराची काहाणी ५ आ उत्तरी सुफळ संपुर्ण .
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment